Thu, Nov 15, 2018 01:32होमपेज › Kolhapur › ‘एसटी’ गँगच्या चार जणांना अटक

घरात घुसून तरुणीशी असभ्य वर्तन; रात्रभर डांबले

Published On: Aug 12 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 1:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राजारामपुरीत राहणार्‍या तरुणीच्या घरात शिरून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी ‘एसटी’ गँगचा सदस्य साईराज दीपक जाधव (वय 29, रा. राजारामपुरी 11 वी गल्‍ली) याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली. पीडित तरुणी पोलिसांत तक्रार देण्यास जाऊ नये, यासाठी तिला शुक्रवारी रात्रभर डांबून ठेवण्यात आले होते. तिच्याजवळील रोख रक्‍कमही संशयितांनी काढून घेतल्याची फिर्याद पीडित मुलीने राजारामपुरी पोलिसांत दिली.साईराज जाधवसह मयूर मल्‍लिकार्जुन पाटील (28, मोरेवाडी), पंकज रमेश पोवार (26, रा. बाईच्या पुतळ्यानजीक), अजिंक्य प्रशात मगर (26, रा. राजारामपुरी 6 वी गल्‍ली)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर आणखी दोघे पसार आहेत.

राजारामपुरीत राहणार्‍या तरुणीला साईराज जाधव हा फोन करून त्रास देत होता. ती फोन उचलत नसल्याने तो सहा साथीदारांसहशुक्रवारी रात्री तिच्या घरात शिरला. तिला जाब विचारत तिचे केस पकडून मारहाण करण्यात आली. तिच्याशी असभ्य वर्तनही करण्यात आले. जाधवच्या साथीदारांनी तिच्याजवळील रोख रक्‍कम हिसकावून घेतली. याबाबत पोलिसांत तक्रार करू नये, यासाठी तिला रात्रभर डांबून ठेवण्यात आले होते.

शनिवारी पीडित मुलगी दबावात होती. अखेर तिने धाडस करून घडलेल्या प्रकाराबाबत राजारामपुरी पोलिसांना माहिती दिली. तिची तक्रार दाखल करून पोलिसांनी तत्काळ जाधवसह चार जणांना अटक केली. चारही जणांना 14 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.