Sat, Nov 17, 2018 16:55होमपेज › Kolhapur › लूटमार; संशयिताकडून एअरगन ताब्यात

लूटमार; संशयिताकडून एअरगन ताब्यात

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 23 2018 12:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राजारामपुरी आठव्या गल्लीत टेलरला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका संशयिताच्या घरातून एअरगन ताब्यात घेण्यात आली.  शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास संजय गुरव यांना रिव्हॉल्वर दाखवून सोनसाखळी हिसकावण्यात आली होती. तिघाही संशयितांचे मोबाईल लोकेशन तपासून खातरजमा करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. 

राजारामपुरीतील भारत हौसिंग सोसायटीनजीक भरदुपारी तिघांनी संजय गुरव यांना लुटले होते. गुरव याच परिसरातील एका कंपनीत काम करतात. दुपारी जेवल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी आठव्या गल्लीत ते आले होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांना लुटले होते. 

तपासकामी ताब्यात घेतलेल्या तिघांकडे चौकशी सुरू आहे. यातील एकाच्या घराची झडती घेतली असता एक एअरगन मिळून आली. तिघांनी गुन्ह्यात रिव्हॉल्वर वापरली की केवळ भीती दाखविण्यासाठी एअरगणचा वापर केला याचा तपास पोलिस करीत आहेत. परिसरातील आणखी काही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन भक्कम पुरावे मिळविण्याचे काम सुरू आहे. तसेच संशयितांच्या मोबाईल लोकेशनचीही माहिती पोलिस घेत आहेत.