शिवराज्याभिषेक : लोककल्याणकारी राज्याचा उदय..

Last Updated: Jun 03 2020 10:50AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

शेकडो वर्षे परकीयांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची ऊर्जा निर्माण करण्याचे अद्वितीय कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण केले. या लोककल्याणकारी राजवटीला 6 जून 1674 रोजी राजधानी रायगडावर मूर्त स्वरूप प्राप्त झाले. ‘देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन’ असे महत्त्व असणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा आज लोकोत्सव आणि राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. 

अशा या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व आणि मोल नव्या पिढीला कळावे या उद्देशाने दै. ‘पुढारी’च्या प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक : लोककल्याणकारी राज्याचा उदय...’ या विषयावर फेसबूक लाईव्ह उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. 6 जून रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ‘पुढारी’च्या अधिकृत फेसबूक पेजवर (pudharionline)  हा कार्यक्रम थेट प्रसारित होणार आहे. या विषयावर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव मार्गदर्शन करणार आहेत.  या उपक्रमात अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान, आम्ही कोल्हापुरी, शिवशक्‍ती प्रतिष्ठान, गडकिल्‍ले ग्रुप,  कोल्हापूर हायकर्स यासह शिवप्रेमी-इतिहासप्रेमी संस्था, संघटना यात सहभागी होणार आहेत. 

राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवछत्रपतींनी रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली. या अद्वितीय ऐतिहासिक घटनेबद्दल जनमानसात प्रचंड आदर, अभिमान आणि औत्सुक्य आहे. यामुळे शिवचरित्रातील ‘शिवराज्याभिषेक’ या ऐतिहासिक घटनेची सखोल माहिती घेण्यात प्रत्येकालाच रस आहे. राज्याभिषेकाची संकल्पना कोणी मांडली, ती कशा स्वरूपाची होती? राज्याभिषेक का करावासा वाटला? त्याची प्रेरणा कोण होते? राज्याभिषेकावेळी मराठा साम्राज्याचा विस्तार कोठेपर्यंत होता? सोहळ्याला कोण मान्यवर उपस्थित होते? यासाठी किती खर्च झाला? यासाठीचे नियोजन कसे झाले? शिवछत्रपतींना कोणत्या पदव्या बहाल करण्यात आल्या? राज्याभिषेकामुळे तत्कालीन इतिहासात कोणते परिणाम पाहायला मिळाले? नव्या पिढीने शिवराज्याभिषेकाच्या इतिहासातून कोणती प्रेरणा घ्यावी? अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. उपक्रमात युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक अशा प्रत्येकाने pudharionline या पेजला लाईक करून सहभागी व्हावे.

पुणे : लहान भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने मोठ्याचे निधन


सर्वांत दिलासादायक बातमी! रशियात कोरोनावरील लसीची मानवी चाचणी यशस्वी


‘ये पुलिस की वर्दी तुम्हारे बाप की गुलामी के लिए नहीं पहनी’


पुणे : घरातील सर्व क्वारंटाईन, गाववाले दचकले, माजी उपसरपंचाने केले वृध्द महिलेवर अंत्यसंस्कार!


आता लातूर जिल्ह्यातही लॉकडाऊनची घोषणा!


गावांच्या निधीवर ग्रामविकासचा डल्‍ला : चंद्रकांत पाटील


वडूथ-सातारा रोडवर बर्निंग कारचा थरार! 


'त्या' मुद्यावर माफी मागा अन्यथा दावा ठोकू; मंत्री हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना इशारा (video)


राज्यात कोरोना मुक्तीचा आकडा वाढला!


जयपुरातून दिल्लीत आलेल्या सचिन पायलटांना ज्योतिरादित्य शिंदेंकडून हळूच फुंकर घालण्याचा प्रयत्न!