Wed, Apr 24, 2019 02:15होमपेज › Kolhapur › कुरूंदवाड पालिकेच्यावतीने अतिक्रमणे हटाव मोहीम

कुरूंदवाड पालिकेच्यावतीने अतिक्रमणे हटाव मोहीम

Published On: Dec 30 2017 1:11PM | Last Updated: Dec 30 2017 1:11PM

बुकमार्क करा
कुरुंदवाड : प्रतिनिधी

कुरूंदवाड पालिकेच्यावतीने मटन मार्केट पाण्याच्या टाकीजवळील अतिक्रमणे हटविण्यासाठी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, पालिकेच्या महिला कर्मचार्‍यांसह पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान अतिक्रमणधारक व मुख्याधिकाऱ्यांच्या चकमक तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी विरोध करणाऱ्या अतिक्रमण धारकांना मुख्याधिकार्‍यांनी  शासकीय कामात अडथळा करत असल्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. तणावपूर्ण वातावरणात ही  दोन घरे पाडण्यात आली. अतिक्रमणधारकांनी लोकप्रतिनिधींना दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता लोकप्रतिनिधींचे मोबाइल स्वीच ऑफ झाले होते.