Tue, Oct 22, 2019 01:50होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार : मुश्रीफ

मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार : मुश्रीफ

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 12:04AMमुदाळतिट्टा : प्रतिनिधी    

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रसंगी आपण विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देऊ. मराठा आरक्षण प्रश्‍न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुचवलेला घटनादुरुस्तीचा मार्ग हाच सर्वोत्तम  तोडगा आहे. सद्यपरिस्थितीत मागास घटकांना असणार्‍या आरक्षणास कसलाही धक्‍का न लावता तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण देता येणे शक्य आहे, असे मत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केले           

मुरगूड (ता. कागल) येथे मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास रविवारी आमदार हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यावेळी ते बोलत होते.

9 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनाचा रविवारी पाचवा दिवस होता. अनेक संघटनांनी  मराठा आरक्षण मागणीसाठी आपला पाठिंबा दिला आहे. ‘आरक्षण आमच्या हक्‍काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा, लाख मराठा’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मुरगूड परिसरातील अनेक गावांतील मराठा समाज मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहे.

माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, ‘बिद्री’चे संचालक गणपतराव फराकटे, दलितमित्र डी. डी. चौगले, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, रघुनाथ कुंभार, शामराव घाटगे, जोतिराम सूर्यवंशी, आबा खराडे, किरण गवाणकर, नगरसेवक दीपक शिंदे, अनिल राऊत, सुधीर सावर्डेकर, रणजित सूर्यवंशी, दत्ता कदम, अमर सणगर, दिगंबर परीट, सुनील चौगले, सुखदेव चौगले, रणजित मगदूम, संदीप भारमल आदी उपस्थित होते.

संजय भारमल यांनी स्वागत केले. तर संतोष भोसले यांनी आभार मानले.