Sun, May 26, 2019 20:39होमपेज › Kolhapur › तमदलगेत रत्नाप्पाण्णा कुंभार सूतगिरणीत शॉर्टसर्किटने आग

तमदलगेत रत्नाप्पाण्णा कुंभार सूतगिरणीत शॉर्टसर्किटने आग

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:31AM

बुकमार्क करा
जयसिंगपूर : प्रतिनिधी

तमदलगे (ता. शिरोळ) येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय  सूतगिरणीतील ब्लोरूम विभागाला अचानक आग लागून सुमारे 60 लाखांचे नुकसान झाले. यामध्ये कापूस, यंत्रसामुग्री, छताचे मोठे नुकसान झाले. शॉर्टसर्किटने मध्यरात्री दोनच्या सुमारास ही आग लागली. 

याबाबत जयसिंगपूर पोलिसांत घटनेची नोंद आहे. दत्त कारखाना शिरोळ, जयसिंगपूर नगरपालिकेच्या अग्‍निशमन बंबाने आग आटोक्यात आणली. या आगीत ब्लेंडो मॅट मशिनसह सीएलपी व एमपीएम, ग्रॅव्हीटी ट्रॅप, सीव्हीटी 3, फॉल सिलिंग, ट्युब लाईट व वायरिंग असा ब्लोरूम विभागातील मुद्देमाल जळून खाक झाला. याबाबत सूतगिरणीचे कर्मचारी रितेश महादेव शिंदे (वय 35, रा. चंदूर) यांनी वर्दी दिली आहे. जयसिंगपूर पोलिस तपास करीत आहे.