Fri, Apr 19, 2019 11:56होमपेज › Kolhapur › कामगारावर बलात्कार 

कामगारावर बलात्कार 

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:28AMइचलकरंजी : प्रतिनिधी 

दारू पाजवून जबरदस्तीने कामगारावर बलात्कार केल्याप्रकरणी वालाराम लिच्छुराम जाट (रा. बोली राजस्थान) याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पीडित कामगाराने वालारामच्या विरोधात फिर्याद दिली आहे. 

रांगोळी येथील एका खासगी कंपनीत संशयित वालाराम ठेकेदार आहे, तर पीडित हा त्याच्याकडे कंत्राटी पद्धतीने कामास आहे. 11 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा.च्या सुमारास पगाराचे पैसे घेण्यासाठी पीडित कंपनीच्या आवारात आला होता. त्यावेळी वालारामने त्याच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याचे अश्‍लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची व झालेला प्रकाराची वाच्यता केल्यास जिवंत मारण्याची धमकी दिली. दरम्यान, सोमवारी दुपारी 1 वा.च्या सुमारास संशयित आरोपीने पीडिताचे फोटो मित्रांच्या मोबाईलवर पाठवले. याबाबत मित्रांनी पीडिताकडे चौकशी केल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडिताने पोलिस ठाण्यात धाव घेऊन वालारामच्या विरोधात फिर्याद दिली. 

Tags : Kolhapur, Rape, Worker