Fri, Mar 22, 2019 23:52होमपेज › Kolhapur › रंकाळा मत्स्यबीज केंद्र पुन्हा सुरू? 

रंकाळा मत्स्यबीज केंद्र पुन्हा सुरू? 

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 12:02AMकोल्हापूर : पूनम देशमुख

जिल्ह्यात रंकाळा आणि तिलारी येथे शासनमान्य मत्स्यबीज केंद्रे आहेत. यातील रंकाळा मत्स्यबीज केंद्र मागील दोन वषार्र्ंपासून बंद आहे. जिल्ह्यातील जलचरसृष्टी अधिक सुदृढ होऊन त्याचे नैसर्गिक पुनर्भरण होण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील तलाव, शेततळ्यांमध्ये दरवर्षी मत्स्यबीज सोडले जातात. मात्र, गेल्या काही वषार्र्ंपासून रंकाळा येथील मत्स्यबीज केंद्रच बंद असल्याने नवीन माशांची पैदास घटली आहे. अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या रंकाळा मत्स्यबीज केंद्रातून यंदा 25 लाख मत्स्यबीजांचे उत्पादन करणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी प्रदीप सुर्वे यांनी दिली. 

या केंद्रामध्ये हडपसर, पुणे, धोम-सातारा, उजनी-सोलापूर येथील हॅचरीजमधून मत्स्यबीज आणून ते तलावात सोडले जातात. दरवर्षी जिल्ह्याला सरासरी चार कोटींपयर्र्ंत मत्स्यबीजांची आवश्यकता असते. मागील काही वषार्र्ंपासून हे केंद्र बंद असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व व्यावसायिकांनी परराज्यातून मत्स्यबीज मागवून व्यवसाय सुरू ठेवला होता. 

जून ते सप्टेंबरअखेर रोहू, कटला, ग्रास, चंदेरा, मृगळ या जातीच्या मत्स्यबीजांचे उत्पन्न घेतले जाते. त्यानंतर त्यांचा मागणीनुसार जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यावसायिकांना पुरवठा केला जातो. यावर्षी परतीचा पाऊस सुरू झाला असताना जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागातर्फे हा नवा प्रयोग केला जात आहे. या हंगामात तुलनेने मत्स्यबीजांचे उत्पन्न कमी प्रमाणात होते. असे असताना 25 लाख मत्स्यबीजांचे उत्पन्न कसे घेणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

सहसा गोड्या पाण्यातील मासे हे स्थानिक परिसरातूनच उपलब्ध होतात. त्यामुळे दरवर्षी त्यांच्या मागणी आणि पुरवठ्यात समतोल साधण्यासाठी मत्स्य विभाग शेततळी तसेच तलावांना मत्स्यबीज पुरवठा करतो. जिल्ह्यात जवळपास 59 तलाव ठेकेदारांना मत्स्यबीज पुरवले जात होते. मात्र, 30 जून 2017 च्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ठेकेदारी पद्धत रद्द करण्यात आली. त्यांनतर पुन्हा आदेश मागे घेण्यात आले होते. सध्या या आदेशाची अंमलबजावणी पुन्हा केली जात आहे.