Sun, Sep 23, 2018 15:46होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : नियमीत विमानसेसाठी जोरदार हालचाली

कोल्हापूर : नियमीत विमानसेसाठी जोरदार हालचाली

Published On: Jun 08 2018 2:27PM | Last Updated: Jun 08 2018 2:27PMकोल्हापूर : पुढारी ऑऩलाईन

 कोल्हापूर विमानतळाच्या विमान प्राधिकरण समितीची बैठक कोल्हापूर विमानतळावर पार पडली. या बैठकीत विमानतळाच्या सुरक्षा, अडचणी व राज्य शासनाच्या परवानग्याबाबत पाठपुरावा करून जादा विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी विमानतळ प्राधिकरणचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर-मुंबई नियमित विमानसेवा सुरू होईल असे काल खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. नाशिकला असलेला स्लॉट मिळेल अशी माहिती त्यांनी दिली होती.  या स्लॉटनुसार  सकाळी साडेसात वाजता कोल्हापुरातून विमान निघेल व सायंकाळी साडेसहा वाजता ते परत येईल.