Fri, Mar 22, 2019 23:53होमपेज › Kolhapur › राजारामपुरी चाकूहल्‍ला; पाच जणांना अटक

राजारामपुरी चाकूहल्‍ला; पाच जणांना अटक

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 22 2018 12:52AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून सख्ख्या भावांवर हल्‍ला करणार्‍या पाच जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. दि. 15 रोजी रात्री राजारामपुरी, 11 व्या गल्‍लीत झालेल्या चाकूहल्ल्यात महेश आनंदराव पाटील (वय 35, रा. जवाहरनगर) जखमी झाले होते.  सनी प्रताप देशपांडे (25, रा. राजारामपुरी), प्रज्वल ऊर्फ जोकर दिनेश देवगिरीकर (19, रा. राजारामपुरी, 11 वी गल्‍ली), नितीन गोविंद आयरे (27, रा. मणेरमळा), इशान शशांक भागवत (23, रा. राजारामपुरी, 14 वी गल्‍ली), बॉब (पूर्ण नाव समजू शकले नाही) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राजारामपुरीतील गणेश पाटील यांची रुग्णवाहिका आहे. रविवारी रात्री ते रुग्णवाहिका घेऊन घरी जात होते. अकराव्या गल्‍लीत थांबलेले सनी देशपांडे, प्रज्वल देवगिरीकर, नितीन आयरे यांनी त्याला अडवले. रुग्णवाहिकेचा प्रकाश अंगावर पडल्यावरून त्यांनी गणेश पाटील यांना मारहाण केली. याचा जाब विचारण्यास आलेल्या महेशवर चाकूहल्‍ला करण्यात आला होता.