Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Kolhapur › सिद्धनेर्ली परिसरात वळवाच्या पावसाची हजेरी

सिद्धनेर्ली परिसरात वळवाच्या पावसाची हजेरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिद्धनेर्ली : वार्ताहर

गेल्या काही दिवसांपूर्वी काही भागात  पडलेल्या पावसानंतर  पुन्हा एकदा सिद्धनेर्ली  परिसरात वळवाच्या पावसाच्या सरी बरसल्या. काही भागात  पावसाने जोरदार हजेरी लावून नागरिकांची त्रेधा उडवली, तर काही ठिकाणी पावसाच्या शिडकाव्याने दिलासा दिला.    

गेल्या काही तासापासून  ढगाळ वातावरण निर्माण झाले हिते तर दुपारपासूनच कुंद वातावरण होते.त्याच बरोबर काल पासूनच उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला होता . दुपारीच संध्याकाळसारखे अंधारुन आले होते, जोडीला वाऱ्यासह वातावरण तंग झाले होते . तीन चारच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. सिद्धनेर्ली ,पिंपळगाव व्हन्नूर अशा विविध भागात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. काही ठिकाणचा पाऊस जोरदार होता, तर काही ठिकाणी जोर फारसा नव्हता, तसेच फार वेळ पाऊस राहिला नाही. या सरींनी प्रमुख रस्त्यावर वाहनचालक आणि पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवल्याचे बघायला मिळाले. पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी मोठी झाडे आणि आडोशाच्या ठिकाणी वाहनचालकांची गर्दी झाली होती.  दहा ते पंधरा मिनिटेच पावासाने हजेरी लावली. या पडलेल्या पावसाने थोडा वेळ का होईना लोकांना गार करून सोडले असले तरी या पावसानंतर पुन्हा हवेत उष्मा वाढण्याची शक्यता आहे.

 

Tags :Kolhapur Environment News, Rain, Siddhnerli, kolhapur, Raining, Heat, Summer 


  •