Thu, Apr 25, 2019 15:57होमपेज › Kolhapur › कोल्हापूरचे दोन शिवभक्‍त करणार सायकलवरून रायगडस्वारी

कोल्हापूरचे दोन शिवभक्‍त करणार सायकलवरून रायगडस्वारी

Published On: Jun 03 2018 7:47PM | Last Updated: Jun 03 2018 7:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी

रायगड येथे होणाऱ्या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी महाराष्‍ट्राच्या कानाकोपर्‍यातून अनेक शिवभक्त शिवरायांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही लाखो शिवभक्त रायगडला रवाना होत आहेत. कोल्हापूरातून देखील असेच दोन शिवभक्त चक्क सायकलवरून रायगडला जाणार आहेत.  प्रकाश ओतारी (रा.शुक्रवार पेठ) आणि दत्तात्रय चौगुले (रा. कसबा बावडा) असे या दोन शिवभक्ताची नावे आहेत.

आज जगभरात सायकल दिन साजरा होत आहे. यात कोल्हापूर देखील काही मागे नाही. कोल्हापूरचे प्रकाश ओतारी आणि दत्तात्रय चौगुले हे दोन तरूण हा एकच दिवस न पाळता कायमच सायकलवरून आपली दैनदिन कामे करीत असतात. हाच वारसा जपत असताना पर्यावरण दिनाचे महत्व पटवून देण्यासाठी गेल्या १२ वर्षापासून हे दोघे रायगड येथे होत असलेल्या शिवराज्यभिषेक सोहळ्याला कोल्हापूर ते रायगड असा सायकल प्रवास करून शिवराज्‍याभिषेकाला हजेरी लावत असतात. यावर्षी देखील हे दोन शिवभक्त सायकलवरून रायगडस्वारी करणार आहेत. उद्या सोमवार दि. ४ जून रोजी पहाटे चार वाजता हे दोघे शिवभक्त कोल्हापूरातून रायगडकडे आगेकूच करणार आहेत.