Mon, May 27, 2019 01:36होमपेज › Kolhapur › छोट्या दोस्तांनो ‘आता बना रेडिओ जॉकी’

छोट्या दोस्तांनो ‘आता बना रेडिओ जॉकी’

Published On: Apr 07 2018 2:00AM | Last Updated: Apr 07 2018 12:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उन्हाळी सुट्टी म्हणजे बालचमुंसाठी पर्वणीच. या सुट्टीचा सदुपयोग करून मुले विविध कलाकौशल्य आत्मसात करतात. अशांसाठी 94.3 टोमॅटो एफ. एम. घेऊन येत आहे, रेडिओ जॉकी वर्कशॉप. सहा दिवस चालणार्‍या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना रेडिओ माध्यमाची संपूर्ण ओळख करून दिली जाणार आहे. 

आज रेडिओ प्रत्येकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपण सर्वजण रोज टोमॅटो  एफ. एम. ऐकतो. रेडिओवरील कार्यक्रम ऐकताना यात आर. जे. कसे बोलतात, त्यांचे बोलणे सर्वांना कसे ऐकू येते, रेकॉर्डिंग कसे केले जाते, फोनवर कसे बोलतात याचे सर्वानाच कुतूहल असते. हे सर्व प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी बालचमूंना वर्कशॉपमधून मिळणार आहे. वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी 14 एप्रिल रोजी ऑडिशन देणे बंधनकारक आहे. यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. या वर्कशॉपमध्ये रेडिओ माध्यमाची ओळख, आर. जे. होण्यासाठी लागणारे गुण, मुलाखत तंत्र, आवाज आणि आवाजाची ओळख, संभाषण कौशल्य, साऊंड एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, प्रेझेंटेशन, अ‍ॅड आणि रेडिओ प्रोमो तयार करणे तसेच रेडिओ जिंगल्स तयार करणे अशा विविध गोष्टी व्यावसायिक रेडिओ जॉकीकडून शिकता येणार आहेत. 

ही कार्यशाळा 18 ते 25 एप्रिल याकालावधीत होणार आहे. तिसरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. वर्कशॉपच्या अधिक माहितीसाठी टोमॅटो एफ. एम. ऑफिस, 5 वा, मजला, वसंत प्लाझा, राजारामपुरी कोल्हापूर. अमोल : 9765566377, प्रणव : 9422022440, 0231 - 6625943. या क्रमांकावर संपर्क साधावा. 
 

Tags : kolhapur, Radio Jockeys, tomato fm kolhapur