Sun, May 26, 2019 09:02होमपेज › Kolhapur › राधानगरीचे समृद्ध पर्यटन उपेक्षांच्या गर्तेत

राधानगरीचे समृद्ध पर्यटन उपेक्षांच्या गर्तेत

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 26 2017 11:45PM

बुकमार्क करा

राधानगरी : वार्ताहर 

राधानगरी आणि परिसरातील नैसर्गिक, भौगोलिक परिस्थिती पाहता पर्यटन ही संकल्पना रुजवणे, वाढवणे सहज शक्य असल्याचे दिसून येते. मात्र, पर्यटन आणि पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे राधानगरी धरण, राधानगरी गवा अभयारण्य, काळम्मावाडी धरण, वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा राऊतवाडी धबधबा आदी ठिकाणे सोई सुविधांपासून आजही वंचित आहेत. त्यामुळे पर्यटनातून होणारे अर्थकारणही ठप्प आहे. 

राधानगरी व परिसराच्या अर्थकारणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडू शकणारी राधानगरी धरणावरील प्रवेशबंदी तत्काळ उठवण्याची नित्तांत गरज आहे. तालुक्याचा पूर्व भाग व कर्नाटक सीमा प्रवेशाची जीवनदायिनी असलेल्या दूधगंगा नदीवरील काळम्मावाडी धरण हे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण. या धरणस्थळावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर उद्यानाची निर्मिती करण्यात आली. त्याला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, या बागेलाही शासकीय अनास्थेचा फटका सहन करावा लागला. देखभाली अभावी ही बाग नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 

जैव विविधतेच्या बाबतीत जागतिक स्तरावर जागतिक स्तरावर नोंद घेतला गेलेला आणि गव्यांसाठी प्रसिद्ध असणारा दाजीपूर परिसरही विविध समस्यांच्या गर्तेत सापडल्याने या जंगलातील गव्यांचे वास्तव्यच धोक्यात आले आहे. गव्यांबरोबरच बिबट्या, अस्वल, सांबर, काळवीट आदींसह विविध प्रकारचे प्राणी तसेच नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेत दुर्मीळ होत असलेल्या वाघाचे ठसे  ढळल्यामुळे येथे वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. या प्राण्यांच्या अस्तित्वाने येथील जैवविविधता अधोरेखित होती. मात्र, प्राण्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारी नैसर्गिक परिस्थिती संबंधित विभागाच्या अनास्थेमुळे झपाट्याने ढासळत असल्यामुळे उपजीविकेसाठी गाव्यांसह अन्य प्राण्यांनी जंगलाबाहेर पडून परिसरातील शेती पिकांचा आश्रय घेतला आहे. 

 पर्यटन दृष्ट्या गवा अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध मात्र, शासनाचे आडमुठे धोरण, पर्यटकांना मूलभूत सोई सुविधांचा अभाव, वन्यजीव विभागाचा पर्यटन विकासात कोलदांडा यामुळे हा प्रकल्प सुरू होण्याआधीच चर्चेत आलाय. जंगलात जाणारा रस्ता खराब झाला असून जंगल सफारीसाठी शासनाने स्वतंत्र वाहन व्यवस्था करणे गरजेचे आहे. प्राण्यांसाठी चराऊ कुरणे, पाण्यासाठी तळी तयार करणे गरजेचे आहे.