Mon, Jun 17, 2019 02:35होमपेज › Kolhapur › सीपीआरमध्ये ‘रेबीज’ लसीचा तुटवडा!

सीपीआरमध्ये ‘रेबीज’ लसीचा तुटवडा!

Published On: May 12 2018 1:28AM | Last Updated: May 11 2018 11:32PMकोल्हापूर : एकनाथ नाईक 

जिल्ह्यात भटक्या कुत्र्याच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक हैराण आहेत. कुत्र्यांकडून सातत्याने ठिकठिकाणी लहान मुलांपासून ते महिला व ज्येष्ठांपर्यंत हल्ले होत आहेत. कुत्र्यांंच्या चाव्यावर उपाय म्हणून ‘रेबीज’च्या प्रतिबंधक लसीशिवाय पर्याय नाही. असे असतानाही पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांचा एकमेव आधार असणार्‍या सीपीआर रुग्णालयात ‘रेबीज’ची लस उपलब्ध नसल्याचे भयाण वास्तव आहे.

सीपीआरला चक्क सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाकडून ही लस मागवावी लागली. कुत्रा, मांजर, उंदीर, कोल्हा, माकड यांनी चावा घेतल्यास रेबीज होतो. जानेवारी ते फेब्रुवारी 2018 मध्ये जिल्ह्यात 5 जणांचा बळी रेबीज रोगाने घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. 40 ते 50 रुग्ण यापूर्वी रेबीजची लस टोचून घेण्यासाठी येत होते,पण गेल्या चार महिन्यापासून सीपीआरमध्ये जवळपास 250 रूग्ण रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी दाखल होत आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रूग्णालय आणि महापालिकेच्या दवाखान्यातील यंत्राणा कुच कामी असल्यामुळे कुत्रा चावल्यानंतर नातेवाईक रूग्णांना घेऊन थेट सीपीआरमध्ये दाखल होतात.काही प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रूग्णालयात ही लस उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे.त्यामुळे रूग्णांचा भार सीपीआरवर पडला आहे. 
सीपीआरमध्ये पुरेशा प्रमाणात ‘रेबीज’ प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने प्रशासनाने सिंधूदुर्ग जिल्हा रूग्णालयाकडून ही लस मागविली आहे. 200 व्हायल मागविण्यात आल्या आहेत.लसीचा तुटवडा असल्याने  गर्भवती महिला, लहान मुले, वयोवृध्दांना लसीसाठी प्राधान्य दिले जाते. भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: थैमान घातले आहे.उपनगरातील नागरीक भयभित झाले आहेत.त्यातच रेबीज प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने रूग्णालय प्रशासनाची तारंबळा उडाली आहे.महानगर पालिकेच्या दवाखान्यात रेबीजची लस उपलब्ध नाही.कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा खर्च मोठा असल्याने महापालिका देखील कुत्र्यापुढे हातबल झाली आहे.दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरीकांच्या जीवावर बेतू लागला आहे.दोन महिन्यात पाच जणांचा रेबीज मुळे मृत्यू झाला आहे.याचे गांभीर्य महापालिका प्रशासनाला नाही. रेबीज प्रतिबंधक लसीसाठी रूग्ण सीपीआरमध्ये डॉक्टरांशी वाद घालत आहेत.‘भिक नको पण कुत्र आवार’ अशीच काहीशी परिस्थिती सीपीआरमध्ये पहावयास मिळू लागली आहे.