Thu, Apr 25, 2019 04:05होमपेज › Kolhapur › आरटीई प्रवेश; ऑनलाईन अर्जास 12 जूनपर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेश; ऑनलाईन अर्जास 12 जूनपर्यंत मुदतवाढ

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 11:20PMकोल्हापूर : प्रतिनिधी

बालकाच्या मोफत व सक्‍तीचा शिक्षणाधिकार कायद्यानुसार आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यास दि. 12 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आरटीईनुसार सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित तत्त्वावरील शाळांमध्ये पहिल्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 टक्के जागा नजीकच्या परिसरातील वंचित गट व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवल्या जातात. शासनाने 17 मे रोजी सुधारित शासन निर्णय जारी केला आहे. 

आरटीई 25 टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेशपात्र सामाजिक वंचित घटकामध्ये अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग बालकांव्यतिरिक्‍त वि.आ.(अ), भटक्या जमाती (ब,क,ड), इतर मागास वर्ग (ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) तसेच एच.आय.व्ही.बाधित,  एच.आय.व्ही. प्रभावित बालकांचा समावेश केला आहे. शासन निर्णयानुसार दि. 29 मे 7 जून या कालावधीत पालकांकडून विद्यार्थी प्रवेशासाठी 179 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. ऑनलाईन अर्जाची 7 जून मुदत होती. 

मात्र, पालकांच्या आग्रहास्तव ऑनलाईन अर्जाची मुदत दि. 12 जूनपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी दिली.