Tue, Jul 23, 2019 17:12होमपेज › Kolhapur › पुढारी थ्री स्टार धूमधडाका वाचक बक्षीस योजना ड्रॉ. क्र. २ ची उद्या सोडत

पुढारी थ्री स्टार धूमधडाका वाचक बक्षीस योजना ड्रॉ. क्र. २ ची उद्या सोडत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’ आयोजित थ्री स्टार धूमधडाका वाचक बक्षीस योजनेंतर्गत वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या ड्रॉ क्र. 2 ची बक्षीस सोडत शाहू स्मारक भवन येथे येत्या शनिवारी सकाळी 11 वा. मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.

अवघ्या 3 महिन्यांत 3 लकी ड्रॉ साठी 3 बक्षीस सोडतींची अभिनव संकल्पना आणि 20000 पेक्षाही जास्त हटके बक्षिसे असल्याने कोल्हापूर शहर व नजीकच्या गावांसाठी असणारी ही योजना प्रचंड गाजत आहे. यातील लकी ड्रॉ क्र. 1 साठीची बक्षीस सोडत संपन्‍न झाली असून त्यातील बक्षीस वितरण पूर्ण होत आले आहे. लकी ड्रॉ क्र. 2 ची बक्षीस सोडत येत्या शनिवारी असून ह्युंदाई इऑन असलेला लकी ड्रॉ क्र. 3 येत्या 7 एप्रिलपासून दिमाखात सुरू होत आहे.

ड्रॉ. क्र. 2 साठी असलेल्या बक्षीस सोडतीमध्ये होंडा क्‍लिक गिअरलेस बाईक (1), ट्रॅव्हल्स बॅग्स (5), अल्ट्रा मॉड टॉवर फॅन्स (7), पोर्टेेबल वॉटर (सेल्फ) प्युरिफायिंग बॉटल्स (11), रूपेरी चांदीची नाणी (31), मिल्टन विवा (टफ जग) (51), उपयुकत कॉपर बोटम एस. एस. हंडी (71), आकर्षक बिग ग्लास बाऊल (1431), खाण्यातील लज्जत वाढवणारे तडका पॅन्स (6001) अशी तब्बल 7609 बक्षिसांची लयलूट या बक्षीस सोडतीद्वारे होणार आहे. त्यामुळे या सर्व हटके बक्षिसांचे विजेते कोण ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

Tags: kolhapur, kolhapur news, pudhari,  three star dhoomDhadka Reader Prize Scheme,


  •