Sun, Jul 21, 2019 01:34होमपेज › Kolhapur › ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शन हाऊसफुल्ल

‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शन हाऊसफुल्ल

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 10:58PMकोल्हापूर : प्रतिनिधी

देश-विदेशातील जीएसटी फ्री सहली, इंटरनॅशनल सहलींमध्ये बच्चे कंपनीला मोफत प्रवास, युरोप टूर्सवर स्पेशल डिस्काऊंट अशा विविध ऑफर्सची बरसात ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स 2018’ प्रदर्शनात करण्यात आली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही प्रदर्शनाला हाऊसफुल्ल गर्दी झाली. आकर्षक टूर पॅकेजीससह डिस्काऊंट ऑफर्सचा लाभ घेत पर्यटनप्रेमी कोल्हापूरकरांनी प्रदर्शनातच विविध सहलींचे ‘ऑन दि स्पॉट’ बुकिंग केले. 

दैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफ. एम. यांच्या वतीने आयोजित आणि ‘सफर टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रायोजित हे प्रदर्शन बसंत-बहार टॉकीज रोडवरील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये भरविण्यात आले आहे. 10 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. क्‍वेस्ट टूर्स या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. 

विविध ऑफर्ससह प्रत्येकांच्या बजेटमधील देश-विदेशातील विविध सहलींचा खजिना खुला करणार्‍या ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाला शनिवारी पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद मिळाला. रविवारीही सुट्टीच्या दिवशी प्रदर्शनाला तुडूंब गर्दी झाली. सकाळपासूनच लोक प्रदर्शनस्थळी येत होते. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन देश-विदेशातील सहलींची माहिती घेत होते. सायंकाळी सहानंतर प्रदर्शन हाऊसफुल्ल झाले. रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.

ऑफर्सची बरसात...

या प्रदर्शनात 25 हून अधिक स्थानिक पर्यटन संस्थांसह जगप्रसिद्ध विविध संस्था, नामवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यांच्याकडून देश-विदेशातील सहलींवर विविध ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये देश-विदेशातील जीएसटी फ्री सहली, इंटरनॅशनल सहलींमध्ये बच्चे कंपनीला मोफत प्रवास, दुबई सहल बुकिंगवर 10 हजार रुपयांची सवलत, युरोप सहलींवर 30 हजार रुपये डिस्काऊंट, इंटरनॅशनल टूर्स बुकिंगवर 10 हजारांपासून 60 हजारांपर्यंत सवलत, युरोप, युएसए टूर्सवर बोनांझा प्राईज ऑफर्स, केरळ, कन्याकुमारी, राजस्थान टूर्सवर 3 हजार रुपये डिस्काऊंट, देशांतर्गत सहलींवर 10 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट, भुतान स्पेशल टूर्स, 1 लाखात रशिया, 5 हजार रुपये फॅमिली डिस्काऊंट व्हाऊचर, ‘अधी फिरायला जा, नंतर पैसे भरा’ योजना, देशाअंतर्गत सहलींवर फ्लॅट 1 हजार रुपये डिस्काऊंट, घरापासून ते घरापर्यंत टुर, बुकिंगवर कुपन अशा ऑफर्स देऊन केल्या आहेत. काही कंपन्यांनी ऑफर्ससाठी नाही, तर ऑप्शनसाठी या, असे आवाहनही केले आहे. 

प्रदर्शनात सहभागी संस्था

सफर टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स, क्‍वेस्ट टूर्स, कॉक्स अँड किंग, थॉमस कुक, कॅप्टन नीलेश गायकवाड,  निम हॉलिडेज, गगन टूर्स, विहार ट्रॅव्हल्स, केसरी, मातृभूमी दर्शन टूर्स, चौधरी यात्रा कंपनी, हनी हॉलिडेज, भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हितस्वी वर्ल्ड हॉलिडेज, कोंडुस्कर हॉलिडेज, बी. जी. टूर्स, एक्सकर्शीया टूर्स, ट्रॅव्हल टूर्स, हॉलिडे स्टोअर इंडिया, वैष्णवी टूर्स, गार्गी टूर्स, अ हेवन हॉलिडे, साई श्रद्धा टूर्स, फिरू या डॉट कॉम, बालाजी पिकनिक टेबल, कॅरिबॅग. 

आज लकी ड्रॉ सोडत 

प्रदर्शनात अ हेवन हॉलिडे या ट्रॅव्हल कंपनीतर्फे ग्राहकांसाठी खास लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता या लकी ड्रॉची सोडत काढण्यात येईल. यामध्ये पहिले बक्षीस थायलंड टूर (एका व्यक्‍तीसाठी), दुसरे बक्षीस गोवा टूर (कपल) आणि तिसरे बक्षीस मोफत पासपोर्ट (तीन व्यक्‍तींसाठी) आहे. लोकांनी लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले  आहे.