होमपेज › Kolhapur › दै.‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब आयोजित कार्यक्रम ‘चला नाती जपूया...’

दै.‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब आयोजित कार्यक्रम ‘चला नाती जपूया...’

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 10:44PMकोल्हापूर : दै. पुढारी कस्तुरी क्‍लब सभासदांसाठी एक आगळा वेगळा अनोखा कार्यक्रम घेऊन येत आहे. ‘चला नाती जपूया...’ या व्याख्यानाद्वारे प्रसिद्ध वक्त्या अ‍ॅड. अपर्णाताई रामतीर्थकर यांचे, कुटुंबातील संवाद व नाजूक नातेसंबंध याविषयी थोडे भावनिक तर थोडे कठोर  काही मजेशीर तर काही रोखठोक असं अत्यंत उत्कृष्ठ व खुर्चीला खिळवून ठेवणारं भाष्य ऐकण्याची संधी महिलावर्गाला मिळणार आहे. 
कस्तुरी क्‍लब महिलांसाठी नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम घेऊन येत असते. यामध्ये सासू- सून यांनी एकमेकींशी कसे वागावे? त्यांच्यातील परस्पर संवाद कसा असावा? हाही महिलावर्गाचा अत्यंत जवळचा विषय  एका वेगळ्याच शैलीत अपर्णाताई सादर करणार आहेत. पिढ्यान् पिढ्यातील नातेसंबंध द‍ृढ करणारा आणि महिला वर्गाने कधीही चुकवू नये असा हा कार्यक्रम गुरुवार, दि. 24 मे रोजी दु. 4.00 वाजता इंद्रप्रस्थ हॉल, राजारामपुरी, लकी बझारच्या वरील बाजूस आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक प्रिस्टीन वुमेन्स हॉस्पिटल हे असून या कार्यक्रमासाठी इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : टोमॅटो एफ एम कार्यालय,
वसंत प्लाझा, 5 वा मजला, 
बागल चौक, कोल्हापूर. 
फोन नं. : 8805007724, 8805024242, 
ऑफीस : 0231 6625943.