Wed, Nov 21, 2018 07:41



होमपेज › Kolhapur › दहा ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान

दहा ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 12:45AM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी (दि.26) मतदान होत आहे. जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यापैकी दोन  बिनविरोध झाल्या आहेत.

करवीर तालुक्यातील वाशी, निटवडे, केकतवाडी, शिरोली दुमाला, चिंचवाड आणि सांगवडेवाडी, पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव, बाजारभोगाव तसेच वाळवेकरवाडी या ठिकाणी मतदान होणार आहे. गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाडी येथेही मतदान होणार आहे. राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. चंदगड तालुक्यातील कडलगे खुर्द सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही तसेच 7 पैकी 2 जागांसाठीही अर्ज आलेले नाहीत. उर्वरित 5 जागांसाठी 5 अर्जच शिल्लक राहिल्याने हे प्रभाग बिनविरोध झाले आहेत.