Sun, Nov 18, 2018 13:47होमपेज › Kolhapur › समितीने पंचगंगेतील जलपर्णीलाच घातला मानवी विळखा!

समितीने पंचगंगेतील जलपर्णीलाच घातला मानवी विळखा!

Published On: Jun 08 2018 11:06AM | Last Updated: Jun 08 2018 11:03AMकुरुंदवाड : प्रतिनिधी 
  
तेरवाड तालुका शिरोळ येथील बंधार्‍यातील पंचगंगा नदी पात्रातील जलपर्णीला पंचगंगा बचाव कृती समितीच्यावतीने मानवी विळखा घालून पंचगंगा प्रदूषण करणाऱ्या घटकांचा व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

आज सकाळी दहा वाजता सुमारास पंचगंगा बचाव कृती समितीचे प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने,कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील,प्रा.चंद्रकांत मोरे,रामभाउ मोहिते,जी.पी जाधव,शिवाजीराव बिडकर,आप्पासाहेब बंडगर,किरण आलासे यांनी तेरवाड बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीपात्रात उतरून जलपर्णीला विळखा घालून प्रदूषण करणाऱ्या घटकांचा व प्रशासनाचा जाहीर निषेध करून कुरुंदवाड येथे पालिका चौकात  साखळी उपोषण करण्यासाठी दाखल झाले आहेत.