Fri, Apr 26, 2019 18:06होमपेज › Kolhapur › घरफाळा वाढीचा मनपाचा प्रस्ताव

घरफाळा वाढीचा मनपाचा प्रस्ताव

Published On: Feb 18 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 1:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महानगरपालिकेच्या मंगळवारी (दि. 20) होणार्‍या महासभेत घरफाळा वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रशासनातर्फे ठेवण्यात आलेल्या या प्रस्तावावर लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने घरफाळा वाढ करणार नाही, अशी भूमिका यापूर्वीच घेतल्याने हा प्रस्ताव फेटाळला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मंगळवारी होणार्‍या महासभेसाठी प्रशासनाने पुरवणी विषयपत्रिका तयार केली आहे. या पत्रिकेवर तीन क्रमांकाच्या विषयानुसार कर आकारणी व वसुली विभागातर्फे 2018-2019 या सालासाठी भारांक व मालमत्ता करवाढीचा सुधारित प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार घरफाळ्यात किती वाढ होणार, कशा पद्धतीने आकारणी होणार, यावर सविस्तर प्रस्ताव महासभेत ठेवण्यात येणार असून त्यावर चर्चा होऊनच घरफाळा वाढीचा निर्णय होणार आहे. नागरी दलित वस्ती सुधारणा योजना 2017-2018 दोन कोटी प्राप्त अनुदानातून नियोजित कामाची निवड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून दुर्बल घटकांसाठी घरबांधणी प्रस्ताव मंजुरी आहे.