Fri, Jul 19, 2019 00:56होमपेज › Kolhapur › शिक्षकांच्या बदल्या मेपर्यंत लांबणीवर

शिक्षकांच्या बदल्या मेपर्यंत लांबणीवर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

मे महिन्याच्या सुट्टीतच सर्व शिक्षकांच्या बदल्या करा, असे आदेश ग्रामविकासचे सचिव असिम गुप्‍ता यांनी जिल्हा परिषदेला दिल्याने शिक्षकांच्या बदलीवरून गेली वर्षभर उडालेला धुरळा अखेर खाली बसला आहे. जिल्हांतर्गत बदल्या लांबणीवर पडल्याने 146 अध्यापक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची पदोन्‍नतीही रखडणार आहे. 

शिक्षक बदल्यांसंदर्भात शुक्रवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत ग्रामविकासचे सचिव असिमकुमार गुप्‍ता यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद सीईओ, शिक्षणाधिकारी यांच्या व्हिडीओ कान्फरन्सिगद्वारे संवाद साधला. आता शैक्षणिक सत्र अंतिम टप्प्यात आल्याने बदल्या झाल्यास विस्कळीतपणा येणार असल्याने मे महिन्यापर्यंत थांबवण्यात आल्याचे जाहीर केले. जानेवारीमध्ये नवीन पोर्टल सुरू केले जाणार असून त्यामध्ये बदलीसंदर्भात शिक्षकांनी माहिती भरावयाची आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये त्याच्या याद्या तयार करून एप्रिलनंतर सुगम-दुर्गमनुसार बदली प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मे महिन्यात बदलीचे आदेश हातात दिले जाणार आहेत. दरम्यान, बदलीचे आदेश निघावेत, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर दुर्गम शिक्षक संघटनांनी उपोषण सुरू केले होते. 

ग्रामविकासच्या सचिवांचे आदेश आल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी उपोषणकर्त्या शिक्षकांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शिक्षकांनीही साखळी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले.