Tue, Mar 19, 2019 21:02होमपेज › Kolhapur › ‘प्रो-कबड्डीमुळे ग्रामीण कबड्डीपटूंना करिअरची संधी’

‘प्रो-कबड्डीमुळे ग्रामीण कबड्डीपटूंना करिअरची संधी’

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 08 2018 11:54PMगुडाळ : वार्ताहर

प्रो-लीग कबड्डी स्पर्धेमुळे कबड्डी खेळाला वेगळे ग्लॅमर प्राप्त झाले असून, ग्रामीण भागातील कबड्डीपटूंना कबड्डीमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचा लाभ कबड्डीपटूंनी घ्यावा, असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. 

गुडाळ (ता. राधानगरी) येथील गुडाळेश्‍वर क्रीडा मंडळ आणि कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी पंचपरीक्षा शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुडाळचे सरपंच अभिजित पाटील होते. 

राधानगरी तालुक्यात प्रथमच आयोजित केलेल्या या पंचपरीक्षा शिबिरासाठी जिल्ह्यातून पन्नासहून अधिक शिबिरार्थी उपस्थित होते. जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रा. अजित पाटील, प्रा. गावडे, भगवान पवार यांनी याप्रसंगी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी भोगावतीचे संचालक ए. डी. पाटील, माजी संचालक महादेवराव कोथळकर, व्ही. डी. पाटील, महेश कोथळकर, सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत विजयसिंह मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन तानाजीराव किल्लेदार यांनी तर आभार संजय मोहिते यांनी मानले.