Tue, Feb 19, 2019 14:11होमपेज › Kolhapur › खासगी सावकारी प्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा

खासगी सावकारी प्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 14 2018 12:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

खासगी सावकारीतून 10 गुंठे जमीन लाटल्याप्रकरणी गांधीनगरच्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. बसाप्पा तातोबा जायगोंडे व भाऊसाहेब बसाप्पा जायगोंडे (दोघे रा. गांधीनगर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत शीला वसंत दीपक (वय 57, रा. नागाळा पार्क) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली. 

फिर्यादी शीला दीपक यांनी जायगोंडे याच्याकडून 60 हजार रुपये हातउसणे घेतले होते. या रकमेपोटी 10 गुंठे जमीन सस्कारपत्र करून मागितली. तसेच व्याजापोटी वेळोवेळी पैसे घेतले. तरीही संशयितांनी 2012 ते 2016 कालावधीतसाठी व्याजाचे 8 लाख 50 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली होती. सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शीला दीपक यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी जायगोंड पिता-पुत्रांविरोधात गांधीनगर पोलिसांत सावकारीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.