Fri, Apr 26, 2019 01:21होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात १६ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात १६ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Published On: Jan 05 2018 1:13AM | Last Updated: Jan 04 2018 8:58PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधित रहावी यासाठी  मुंबई पोलिस अधिनियम 1951 मधील कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिनांक 16 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार शस्त्रे, बंदुका, सोटा, तलवारी, भाले, सुर्‍या, लाठी अगर काठी किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्याही वस्तू बरोबर घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

ज्वालाग्रही पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर सहज फेकून त्याचा मारण्यासाठी उपयोग करणे, व्यक्ती, अगर त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन आणि दहन करणे, सार्वजनिक घोषणा देणे, गाणी म्हणणे आणि वाद्ये वाजविणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता आणि नितीविरुद्ध जाऊन निरनिराळ्या जातींच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन त्यांच्यात भांडणे निर्माण होऊन शांततेस आणि कायदा सुव्यवस्थेस बाधा येईल अशी सोंगे करणे व त्याचा प्रसार करणे आणि पाचहून अधिक व्यक्‍तींना एकत्र जमा होण्यासही बंदी घालण्यात आली आहे.