Sat, Jul 20, 2019 23:57होमपेज › Kolhapur › शिवछत्रपती जयंतीची सर्वत्र जय्यत तयारी

शिवछत्रपती जयंतीची सर्वत्र जय्यत तयारी

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 11:34PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका’, अशी शिस्त शिवछत्रपतींनी आपल्या मावळ्यांना लावली होती. रयतेच्या राजाचा हा लोककल्याणकारी  वारसा जपण्याचे कार्य आजच्या युवा पिढीकडून घडावे या उद्देशाने समाजप्रबोधनाची शिवजयंती साजरी करण्यावर प्रत्येकाचा भर असतो. रविवार, दि. 19 फेब्रुवारी रोजी होणार्‍या शिवछत्रपतींच्या जयंतीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. शिवभक्त-इतिहासप्रेमी संस्था-संघटना-तालीम-मंडळांकडून ऐतिहासिक देखावे उभारणे, पुतळ्यांचे सुशोभीकरण, गडकोटांची स्वच्छता अशा उपक्रमांचे नियोजन सुरू असून स्थानिक प्रशासनाच्या वतीने शिवछत्रपतींच्या स्मारक परिसरात स्वच्छता, विद्युत रोषणाई, मिरवणूक मार्गाची डागडुजी अशी कामे सुरू आहेत. 

शिवछत्रपतींनी दुरदृष्टीने लोककल्याणासाठी राबविलेल्या योजना, त्यांचे पुरोगामी विचार, शेती विषयक धोरण, संरक्षणाच्या उद्देशाने उभे केलेले गडकोट-किल्ले आणि विकसीत केलेले युध्दतंत्र या व अशा इत्यभूत इतिहासाची माहिती देणारे फलक, सजीव व तांत्रीक देखाव्यांची तयारी केली जात आहे. इतिहास संशोधकांची व्याख्याने, शिवशाहिरांचे पोवाड, शिवकालीन युध्दकलांची चित्तथरारक प्रात्यक्षीके, ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन, गडकोट किल्ल्यांच्या मोहिमा या व अशा कार्यक्रमांनी परिपूर्ण असा हा सोहळा अविस्मरणीय बनविण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरु आहेत. 

डॉ. आंबेडकर जयंती समितीतर्फे बिंदू चौकात उद्या व्याख्यान...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता, ऐतिहासिक बिंदू चौकात व्याख्यान होईल. जाती-धर्माची बंधने नाकारून सर्वच समाज बांधवांच्यात राष्ट्रीयतेची भावना विकसीत करणार्‍या विषयावर डॉ. हरिष भालेराव व इंद्रजीत सावंत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा पोलिस अधिक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते होईल. यावेळी अध्यक्ष सखाराम कामत, प्रा. विश्‍वास देशमुख, प्रा. शहाजी कांबळे आदी उपस्थित राहाणार आहेत. 

निवृत्ती चौकातील स्मारकाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात...
शिवाजीपेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे शिवजयंतीचा सोहळा विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. पारंपारिक पध्दतीची मिरवणूक, शिवशाहिरांचे पोवाडे, तज्ज्ञांची व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांचे यानिमीत्ताने आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या शिवजयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे निवृत्ती चौकातील शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभिकरण असणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर व माजीनगरसेवक रविकिरण इंगवले यांच्या प्रयत्नातून यासाठीचा निधी उपलब्ध झाला आहे. पुतळा परिसराचे सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून शिवजयंतीपूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. 

शासनातर्फे जन्मस्थळी सोहळा...
महाराष्ट्र शासनाच्यावतीने 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मस्थळी म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा सोहळा आयोजित केला जातो. शिवछत्रपतींच्या मार्गदर्शक राजमाता-राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यासह बालशिवाजींच्या पुतळ्याचे पूजन करून आणि पाळणा म्हणून कार्यक्रमाची सुरुवात होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री, लोकप्रतिनिधी, इतिहास संशोधकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिवभक्त-इतिहासप्रेमी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते.  

दिल्लीतील सोहळ्याची तयारी पूर्ण
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या संकल्पनेनुसार यंदा प्रथमच देशाची राजधानी दिल्ली येथे कोल्हापूरकरांच्या पुढाकाराने शिवजयंतीचा सोहळा होत आहे.  सोमवार दि. 19 व मंगळवार दि. 20 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास, संस्कृति यांची ओळख जगभर करून देण्याचा,तसेच शिवछत्रपतींचे दुरदृष्टीचे आणि लोकोपयोगी जीवनकार्य समजावे  व त्यांचा प्रेरणादायी इतिहास भावी पीढीपर्यंत पोहोचावा असा मानस आहे. दरम्यान, दिल्लीतील सोहळ्यासाठी कोल्हापूरातून शिवशाहीर, शिवछत्रपतींच्या जीवनावर महानाट्य सादर करणारे कलाकार, युध्दकलांची प्रात्यक्षीके सादर करणारे सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे आणि इतिहासप्रेमी रवाना झाले आहेत. दिल्ली येथे संभाजीराजे, संयोगीताराजे व शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे पदाधिकारी-कार्यकर्ते सक्रीय AmhoV.