Sat, Feb 23, 2019 04:47होमपेज › Kolhapur › कुटुंब रंगलंय... मॅरेथॉनच्या जय्यत तयारीत !

कुटुंब रंगलंय... मॅरेथॉनच्या जय्यत तयारीत !

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 24 2018 11:45PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडानगरी कोल्हापुरातील अनेक कुटुंबीय सध्या मैदानात कसून सराव करत आहेत. आई-बाबा, आजोबा-आजी, दादा-दीदी यांच्यासह बालचमूही मोठ्या उत्साहाने 11 फेब्रुवारी रोजी होणारी मॅरेथॉन फत्ते करण्यासाठी जोरदार सराव करत आहेत. सकाळ व संध्याकाळच्या सत्रात विविध प्रकारच्या व्यायामातून त्यांची जय्यत तयारी सुरू आहे. ‘डी.वाय.पी. रग्गेडियन कोल्हापूर अल्ट्रा मॅरेथॉन’ अवघ्या काही दिवसांवर आली आहे. 

दैनिक ‘पुढारी’ मॅरेथॉनचे असोसिएट पार्टनर असून, डी. वाय.पी. ग्रुप टायटल स्पॉन्सर व टोमॅटो एफ.एम. हे रेडिओ पार्टनर आहेत. कॉसमॉस बँक गोल्ड स्पॉन्सर, फॉर्च्युन शहा गु्रप सिल्व्हर स्पॉन्सर, जे. के. गु्रप व्हेंचर ऑफ कोरगावकर पेट्रोल पंप, कोंडुसकर ट्रॅव्हल्स, आयनॉक्स सिनेमा तसेच हॉट फ्रायडे टॉक्स, लाईफस्टाईल पार्टनर, इन्सटिंक्ट मीडिया डिजिटल पार्टनर, हॉटेल थ्री लिव्ह, एस. जी. यू. सिल्व्हर स्पॉन्सर यांचे सहकार्य लाभले आहे.

इंटरनेटमुळे कमी होत चाललेला संवाद आणि शारीरिक हालचाली या दोन्ही गोष्टींमुळे कुटुंबे दुरावत चालली आहेत. रग्गेडियनच्या विविध उपक्रमांत सहभागी होणार्‍या कुटुंबीयांच्या कौटुंबिक स्वास्थ्याचे सकारात्मक परिणाम बघून आता बरीच कुटुंब घरातल्या सर्वांना एकत्रितपणे या मॅरेथॉनमध्ये सहभागी करून घेत आहेत. त्यात स्पर्धेच्या टप्प्यांवर विविध मनोरंजनाची सोय असल्याने कुटुंबाला एकत्रितरीत्या थेट मनोरंजनाचा आस्वाद घेता येणार आहे. म्हणूनच अजूनही वेळ गेलेली नाही. एरव्ही एकत्र सिनेमाला, कुठे तरी फिरायला तर आपण जातोच; पण एकत्र पळायला गेल्याने शारीरिक स्वास्थ्यही जपले जाऊन आरोग्यवर्धक भारतीय सवयी पुन्हा रूजविल्या जातील, त्यामुळे कुटुंबांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मॅरेथॉन अनुभवावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी  www.kolhapurrun.com /  www. ruggedian. com या संकेतस्थळावरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी रग्गेडियन स्टोअर्स डी.वाय.पी. मॉल तिसरा मजला, डी.टी. कारेकर सराफ घाटी दरवाजा अंबाबाई मंदिरसमोर, रग्गेडियन ऑफिस आमात्य टॉवर, चौथा मजला दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर आदी ठिकाणी सुरू असून, याठिकाणी किंवा  9623688881/  8806226600/  9623688886 या क्रमांकावर संपर्क साधावा.