Thu, May 23, 2019 20:42
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › चला जाऊ वारीला... प्रतिपंढरपूरला...

चला जाऊ वारीला... प्रतिपंढरपूरला...

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 22 2018 11:28PMदेवाळे : वार्ताहर

प्रतिपंढरपूर नंदवाळ (ता. करवीर) येथे सोमवारी आषाढी यात्रा व पुईखडी येथे रिंगण सोहळा होत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, मंदिर आवारात नारळ फोडणे व डिजिटल फलक लावण्यास बंदी आहे.

आधी नंदापूर, मग पंढरपूर अशी आख्यायिका असणार्‍या नंदवाळ येथे आषाढी एकादशीच्या पहाटे चारपर्यंत पंढरीचा पांडुरंग या मंदिरात वास्तव्य करतो, असा करवीर माहात्म्य ग्रंथात उल्लेख आहे. नंदवाळ हे विठ्ठलाचे निजस्थान आहे.

आषाढी वारीला मोठा वैष्णवांचा सोहळा होत आहे. या सोहळ्याला लाखो भाविक दर्शनासाठी येतात. कोल्हापूर ते नंदवाळ असा पालखी सोहळा होत असून, या सोहळ्यात  विविध गावच्या दिंड्या सहभागी होतात आणि पुईखडी येथे रिंगण सोहळा पार पडतो. हा सोहळा पाहण्यासाठी विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने हजर राहतात,  तसेच भोगावती, राधानगरी भागातून येणार्‍या दिंड्यांचे रिंगण खत कारखाना वाशी येते होते. रिंगण झाल्यानंतर भाविक शिस्तबद्धपणे दिंडीने नंदवाळ मंदिराकडे येतात.

यात्रा काळात दर्शन रांगा व मुखदर्शन अशी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. वाहन पार्किंग  हजारे पेट्रोल पंप, खत कारखाना येते करण्यात आले आहे. नंदवाळ फाटा येथून वाहने नंदवाळकडे सोडली जाणार नाहीत, त्यामुळे भाविकांनी वाशी फाटा ते मंदिरापर्यंत पायी चालत प्रवास करायचा आहे. चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.