Fri, Feb 22, 2019 19:46होमपेज › Kolhapur › प्रॅक्टिस-दिलबहार सामनाही तुल्यबळ

प्रॅक्टिस-दिलबहार सामनाही तुल्यबळ

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 11:37PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

शुक्रवारप्रमाणेच शनिवारचा दिवसही बरोबरीचा ठरला. प्रॅक्टिस क्‍लब ‘अ’ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. 

केएसए आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला. प्रॅक्टिसच्या सैद मैनुद्दीन, जॉन्सन, श्‍लोक साठम, ओंकार जाधव, शुभम मस्कर, किरण चव्हाण यांनी गोलसाठी चढाया सुरू ठेवल्या. 20 व्या मिनिटाला सैद मैनुद्दीनच्या पासवर जॉन्सनने गोल नोंदविला. 

दिलबहारकडून गोल फेडण्यासाठी प्रयत्न सुरूच होते. प्रतीक व्हनाळीकर, रोहन पाटील, प्रशांत आजरेकर, ओंकार शिंदे, शुभम सरनाईक, शशांक माने यांनी योजनाबद्ध चाली केल्या. 36 व्या मिनिटाला रोहन पाटीलच्या पासवर प्रतीक व्हनाळीकरने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. 

उत्तरार्धात सामना अधिकच चुरशीचा झाला. दोन्ही संघांकडून आघाडीसाठी जोरदार चढायाचा अवलंब करण्यात आला. 45 व्या मिनिटाला पॅक्टिसच्या रोहित भोसलेच्या पासवर जॉन्सनने वैयक्‍तिक आणि संघाकडून दुसरा गोल केला. दिलबहारकडून गोल फेडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरूच होते. यात त्यांना 70 व्या मिनिटाला यश आले. प्रतीक व्हनाळीकरच्या पासवर शुभम सरनाईकने गोल नोंदवत सामना 2-2 असा बरोबरीत आणला.