Sun, Dec 16, 2018 21:25होमपेज › Kolhapur › विक्रीकर निरीक्षक :  महिला प्रवर्गात भिवसे प्रथम

विक्रीकर निरीक्षक :  महिला प्रवर्गात भिवसे प्रथम

Published On: Dec 15 2017 2:49AM | Last Updated: Dec 15 2017 2:49AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत कोल्हापूरने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. प्राची सखाराम भिवसे या महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम आल्या आहेत. अहमदनगर येथील दादासाहेब सुखदेव दराडे हे प्रथम आले आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गातून किशोर यादव यांनी द्वितीय, प्रशांत शिंदे यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. कोल्हापुरातील एस.एस.सी. बोर्डाजवळील पद्मा कॉलनीत राहणार्‍या प्राची भिवसे यांनी महिला प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळविला आहे. भिवसे यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात बी.टेक. केले आहे. जानेवारी 2015 पासून राज्यसेवा परीक्षा अभ्यासास सुरुवात केली.

एक गुणाने विक्रीकर निरीक्षक परीक्षा अनुत्तीर्ण ठरल्यानंतर जोमाने अभ्यास केला. राज्यात प्रथम आल्याने खूप छान वाटत आहे. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. राज्यसेवा परीक्षा देऊन क्‍लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न आहे, असे प्राची भिवसे म्हणाल्या.शिवाजी विद्यापीठ भूगोल अधिविभागातील एम.ए. उत्तीर्ण असलेल्या प्रवीण बळीराम पाटील (रा. म्हाळुंगे, ता. करवीर) हे 136 गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.