Sat, Jan 19, 2019 22:57होमपेज › Kolhapur › तंत्रनिकेतन प्राध्यापक लाच घेताना जाळ्यात

तंत्रनिकेतन प्राध्यापक लाच घेताना जाळ्यात

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 10 2018 1:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कामाचा दर्जा व तांत्रिक तपासणी अहवाल देण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या शासकीय तंत्रनिकेतन येथील स्थापत्त्य अभियांत्रिकी अधिव्याख्याता शिवाजी तुकाराम काटकर (55) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. काटकर याच्या मोरेवाडी रोडवरील निवासस्थानावर पथकाने रात्री उशिरा छापा टाकून तपासणी केल्याचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितले. 

तक्रारदार आशफाक बादशाह मकानदार यांच्या पत्नीचा बांबू फर्निचर व रिसॉर्ट मॅन्युफॅक्चरचा व्यवसाय आहे. वनखात्याकडून आळते येथील श्री क्षेत्र रामलिंग परिसरात वन पर्यटनासाठी बांबूंची घरे बनविण्याचे कंत्राट देण्यात आले.  बिलाच्या पूर्ततेसाठी वनखात्याने शासकीय तंत्रनिकेतनकडून झालेल्या कामाचा दर्जा व तांत्रिक अहवाल मागविला होता. त्यासाठी शासकीय फीदेखील भरण्यात आली.
कामाचा दर्जा, तांत्रिक अहवाल देण्यासाठी काटकर यांनी मकानदार यांच्याकडे पाच हजार रुपयाची मागणी केली. मकानदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाचे पोलिस उपअधीक्षक गोडे यांंच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.त्यानुसार सापळा रचून प्राध्यापकांना जेरबंद करण्यात आले.