Thu, Sep 20, 2018 10:07होमपेज › Kolhapur › शिरोळ नगरपरिषदेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान

शिरोळ नगरपरिषदेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान

Published On: Sep 11 2018 7:42PM | Last Updated: Sep 11 2018 7:42PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्मित शिरोळ नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर २०१८ रोजी मतदान; तर २२ ऑक्टोबर २०१८ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून (११ सप्‍टेंबर) आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. 

सहारिया यांनी सांगितले की, शिरोळ नगरपरिषदेच्या अध्यक्ष व १७ सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. नामनिर्देशपत्रे २४ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशपत्रांची छाननी १ ऑक्टोबर २०१८ रोजी होईल. नामनिर्देशपत्रे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान २१ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २२ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.