Sun, Jul 21, 2019 02:17होमपेज › Kolhapur › बेकायदा मद्य वाहतूक रोखण्यासाठी ‘झीरो पोलिस’

बेकायदा मद्य वाहतूक रोखण्यासाठी ‘झीरो पोलिस’

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 12:23AMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

स्वस्तात मस्त, पण झिंग आणणार्‍या गोव्यातील दारूची महाराष्ट्रात होणारी तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा सीमावर्ती भागात कमिशनवर झीरो पोलिसांची यंत्रणा उभारण्याचा निर्धार एक्साईजने घेतला आहे. या निर्णयामुळे दरवर्षी बुडणारा कोट्यवधीचा महसूल शासनाच्या तिजोरीत पडणार आहे.  तस्करीमुळे जिल्ह्याला किमान वर्षाला 100 कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागत होते. नव्या उपाययोजनेमुळे त्याला आळा बसेल, असे एक्साईच्या प्रशासनाचे म्हणणे आहे. 

कोल्हापुरात चार तासांत गोवा आणि तेवढ्याच अंतरावर हुबळी आहे. त्यामुळे या चार तासांत कोल्हापुरात दारू आणता येते, याची खात्री झाल्याने पोलिसांची भीती न बाळगता, ‘इझी मनी’साठी मोठ्या प्रमाणावर युवक दारूच्या तस्करीच्या गुन्ह्यात अडकले आहेत. इतकेच नव्हे, तर अशा युवकांच्या जिल्ह्यात टोळ्या सक्रिय आहेत. पोलिसांचा डोळा चुकवून कुठून कशी दारू आणावयाची, यामध्ये ही यंत्रणा तरबेज आहे. शिवाय, एखाद्यावेळी गाडी पोलिसांना मिळाली की, मोठा गुन्हा दाखल होतो; पण ठोस पुरावा नसल्याने त्यातून सुटकाही होऊ शकते, हे आता या गोरख धंद्यातील तरुणांना कळून चुकले आहे. त्यामुळे तरुण अशा तस्करीला चांगलीच सोकावली आहे.

गोव्यातील दारू कोल्हापुरातील दारूपेक्षा कमी किमतीत मिळू लागल्याने तस्करांना चांगले ग्राहक मिळू लागले आहे. त्याशिवाय घरपोहोच सेवा असल्यामुळे दुकानात जाण्याचे झंझट नाही. यामुळे गोवा मेड दारू जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर येऊन तिचा खपही वाढत आहे. अशा चोरट्या दारू वाहतुकीला आळा घालण्याचे उत्पादन शुल्क विभागासमोर मोठे आव्हानही निर्माण झाले आहे. यातून झीरो पोलिसांचा पर्याय पुढे आला आहे. 

सध्या जिल्ह्यात 20 ते 25 झीरो पोलिस कार्यरत आहेत, गेली अनेक वर्षे ते काम हेच करत आहेत, तस्कारांना झीरो पोलिस कोण, हे कळून चुकले आहेत. त्यामुळे तस्करांनी वेगळ्या वाटा शोधल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या झीरो पोलिसांचे सुगावे कमी पडत आहेत, तर या यंत्रणेतील काही जण स्वत:च या व्यवसायात उतरले आहेत.  त्यामुळे झीरो पोलिसांची जुनी एकत्र आता कालबाह्य ठरू लागली आहे, त्यामुळे नव्या दमाची आणि खरी माहिती देणारी यंत्रणा असावी, यासाठी उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

यंत्रणा सक्रिय होणार 

तपास यंत्रणेमध्ये खबर्‍याला अतिशय महत्त्व आहे; पण खबर्‍या तितकाच प्रामाणिक असावयास हवा, खबर देताना त्याने दोन्ही दरडीवर हात ठेवला की तपास यंत्रणेचे श्रम वाया जाते, यासाठी मानधनावर झीरो पोलिस यंत्रणा वाढविण्यात येणार आहेत, जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी आणि सीमावर्ती भागात अशा झीरो पोलिसांची यंत्रणा कार्यरत राहणार आहे. जेथून गोवा आणि हुबळीमेड कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करते, त्याच मार्गावर आणि त्याच परिसरातील खबरे, झीरो पोलिसांची यंत्रणा सक्रिय करण्यात येणार आहे. +

पारंपरिक नाक्यांवरील तपासणीत बदल

दारूची तस्करी रोखण्यासाठी जिल्हा उत्पादन शुल्क कार्यालयाने पारंपरिक तपासणी नाक्यांबरोबर तस्करीच्या मार्गाचा सर्व्हे केला आहे. त्यासाठी चौक, फाटे निश्‍चित केले आहेत. अशा ठिकाणीही आता वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. जेणेकरून चोराला कोठूनही संधी मिळू नये, असा यामागील उद्देश आहे.