Fri, Apr 26, 2019 01:42होमपेज › Kolhapur › पोलिस भरतीच्या आमिषाने तरुणांना १४ लाखाला गंडा

पोलिस भरतीच्या आमिषाने तरुणांना १४ लाखाला गंडा

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 12:03AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

पोलिस भरतीच्या आमिषाने तरुणांना 14 लाखाला गंडा घातल्याप्रकरणी बाळासाो भाऊसो शेंडगे (वय 50, रा. तळंदगे, हातकणंगले) याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत दोन तक्रारदारांनी पेठवडगाव पोलिसांत अर्ज  दिला होता. 

महेश सुभाष चव्हाण (रा. सावर्डे, ता. हातकणंगले) व अविनाश शंकर वडर (रा. किणी) या दोघांनी पोलिस भरतीसाठी अर्ज केल्याची माहिती शेंडगे याला होती. ‘माझी पोलिस खात्यात ओळख असून तुमचे पुणे येथ काम करून देतो’, असे शेंडगे याने दोघांना सांगितले. या कामासाठी संशयित शेंडगे याने वेळोवेळी पैसे घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

तपासाचे आदेश 

पेठवडगाव न्यायालयाने सीआरपीसी 156 (3) प्रमाणे तक्रार अर्जाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. यावरून गुरुवारी एमआयडीसी शिरोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.