होमपेज › Kolhapur › अफवांचे मेसेज प्रसारित करणार्‍यांवर पोलिसांची नजर

अफवांचे मेसेज प्रसारित करणार्‍यांवर पोलिसांची नजर

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मुले चोरणार्‍या टोळीच्या नावाने काही अनोळखी व्यक्ती किंवा महिलांचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. नुकत्याच सोलापुरात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. अशा अफवांचे मेसेज मोबाईलवर आल्यास ते फॉरवर्ड करू नयेत, तसे करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. 

राज्यभरात विविध जिल्ह्यात सध्या मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा पसरविण्यात येत आहेत. अनेक सामान्य नागरिकांनाही मारहाणीचे प्रकार घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर अफवांचे मेसेज, व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, ट्विटरवरून प्रसारित होत असल्याने गोंधळात भर पडत आहे. यामुळे असे मेसेज फॉरवर्ड करणार्‍यांवर पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरून प्रसारित होणार्‍या सर्व मेसेजवर पोलिसांची करडी नजर असून कोणीही असे मेसेज पुढे पाठवू नये, असे आवाहन कोल्हापूर पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.