Wed, Jun 26, 2019 17:30होमपेज › Kolhapur › IPLच्या सामन्यावेळी इचलकरंजीत सट्टेबाजी! बुकीज पोलिसांच्या जाळ्यात

IPLच्या सामन्यावेळी इचलकरंजीत सट्टेबाजी!

Published On: Apr 22 2018 10:00AM | Last Updated: Apr 22 2018 10:07AMइचलकरंजी (कोल्हापूर) :  पुढारी ऑनालाईन 

आयपीएल क्रिकेट बेटींग प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.  राजू गडकरी असे या युवकाचे नाव आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यादरम्यान बेटींग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या सामन्यादरम्यान राजू गडकरी बेटींग करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारावर  शिवाजी नगर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. बेटींगचे पैसे घेताना राजू गडकरीला हातोहात पकडले. याशिवाय पोलिसांना बेटींगच्या अड्यावरुन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे समजते. 

Tags : Police, IPL betting, IPL betting racket, Ichalkaranji Arrested,  bookies, Kolhapur