Wed, Jul 17, 2019 20:49होमपेज › Kolhapur ›  30 हजारांवर स्पर्धकांचा सहभाग

 30 हजारांवर स्पर्धकांचा सहभाग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

पोलिस-जनता यांच्यात सुसंवाद घडावा, किंबहुना युवा वर्गात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत आयोजित ‘महाराष्ट्र पोलिस युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप 2017 स्पर्धेसाठी 30 हजारांवर युवक-युवती सहभागी होत आहेत, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जानेवारीत कोल्हापुरात स्पर्धेचा समारोप होईल, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर परिक्षेत्रात आयोजित पोलिस युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप 2017 या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी ( दि.24) रात्री कराड (जि. सातारा) येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी श्रीमती श्‍वेता सिंघल यांच्या उपस्थित झाला. 

2016 मध्ये कोल्हापूर परिक्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर झालेल्या स्पर्धेत 15 हजारांवर युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. युवक-युवतींकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे शासनाने स्पर्धेची दखल घेऊन यंदा होत असलेल्या स्पर्धेला पाच जिल्ह्यांसाठी 35 लाख रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या माध्यमातून 30 हजार युवक-युवतींना व्यासपीठाची संधी मिळणार आहे. 

सुमारे 5 लाख विद्यार्थ्यांना स्पर्धेचा लाभ होईल, असेही नांगरे-पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, डॉ. प्रशांत अमृतकर, भारतकुमार राणे, एनजीओ मिलिंद धोंड उपस्थित होते.