Fri, May 29, 2020 08:57होमपेज › Kolhapur › वडगाव ठाण्यातील पोलिस नाईक लाच घेताना जाळ्यात

वडगाव ठाण्यातील पोलिस नाईक लाच घेताना जाळ्यात

Published On: Dec 14 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 2:46AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

एका प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्यामध्ये प्रतिबंधक कारवाईवेळी जामीन होण्यास मदत करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना वडगाव पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक दत्तात्रय श्रीपती चव्हाण याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. 

याप्रकरणी पाचशे रुपयाची लाच मागणी करण्यात आली होती. सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा केली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे, पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी केली.