Fri, Nov 16, 2018 13:52होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहूंना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करा

राजर्षी शाहूंना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करा

Published On: Jul 24 2018 1:10AM | Last Updated: Jul 24 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी खा. धनंजय महाडिक यांनी आज लोकसभेत केली. नियम 377 अंतर्गत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना त्यांनी ही मागणी केली. 

ते म्हणाले, सन 1874 मध्ये जन्मलेल्या शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया रचला. 1894 मध्ये त्यांनी गुलामगिरी प्रथा मोडीत काढली. सर्व जाती-धर्मातील मुला-मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी महाराजांनी कोल्हापुरात 11 बोर्डिंग सुरू केली. त्याकाळी महाराजांनी मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकरीत आरक्षण सुरू केले. विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. राधानगरी धरण बांधून पाण्याचा प्रश्‍न सोडवला. कोल्हापुरात गुळाची बाजारपेठ उभारली. अशा या दूरद‍ृष्टीच्या लोकराजाला केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी करून खा. महाडिक यांनी कोल्हापूरचा आवाज दिल्‍लीत बुलंद केला आहे.