Sun, Feb 24, 2019 04:57होमपेज › Kolhapur › प्लास्टिकबंदीने बांबू उत्पादनाची चलती

प्लास्टिकबंदीने बांबू उत्पादनाची चलती

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 07 2018 11:26PMकोतोली : वार्ताहर 

महाराष्ट्रात प्लास्टिकवर  बंदी आल्यापासून बांबूच्या उत्पादनाकडे ग्राहक पुन्हा नव्याने वळल्याने बांबूच्या कारागिरांना सुकाळ तर प्लास्टिक व्यवसायात दुष्काळ आला आहे.

डिजिटल युगात प्लास्टिक अतिक्रमण करत असतानाच शासनाने महाराष्ट्रभर यावर बंदी घातली आहे. झटपट मिळणार्‍या, बाजारपेठर झगमगाट निर्माण करणार्‍या प्लास्टिक  वस्तूंकडे ग्राहकांनी पाठ फिरवून लाकूड, बांबूपासून तयार करण्यात येणार्‍या विविध वस्तूंकडे ग्राहक पुन्हा वळला आहे. बाजारपेठ बांबूच्या वस्तूंनी गजबजू लागली असून कारागिरांच्या घरीही वस्तू खरेदी साठी ग्राहकांची वर्दळ होऊ लागली आहे. मनुष्याला जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत बांबूच्या वस्तू लागतात. या वस्तूंना पूर्वापार मागणी वाढू लागली आहे. यात घरात रोजच्या लागणार्‍या वस्तूंपासून ते लग्न शुभारंभ, डेकोरेशन आदीसाठी वापर करतात. ग्रामीण भागात पावसाळ्यात पावसापासून संरक्षण होण्यासाठी यरल्याचा वापर करावा लागतो. शेतीसाठी लागणारी शेतीची औजारे, इमारत बांधकाम करण्यासाठी, शेतात खोप घालणे, वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर करण्यासाठी  लाकूड व बांबूची मागणी वाढल्याने बुरुड व्यवसाय तेजीत आहे. येथील समाज कामात मग्न आहे, तर प्लास्टिक व्यावसायिक अडचणीत सापडल्याने मालकासह कामगारांना रोजगाराची चिंता लागली आहे.