Thu, May 23, 2019 04:31होमपेज › Kolhapur ›  पर्ल्स गुंतवणूकदारांचा मोर्चा

 पर्ल्स गुंतवणूकदारांचा मोर्चा

Published On: Mar 25 2018 12:37AM | Last Updated: Mar 24 2018 11:06PMकोल्हापूर : प्रतिनिधी

पर्ल्स कंपनीकडील गुंतवणूकदारांचे एकरकमी पैसे मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी 2 एप्रिल रोजी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सेबी कार्यालयावर दहा हजार गुंतवणूकदारांचा मोर्चा काढण्याचा निर्णय अखिल भारतीय पर्ल्स गुंतवणूकदार संघटनेच्या मेळाव्यात घेण्यात आला. 

पर्ल्स गुंतवणूकदार संघटनेचा शनिवारी मेळावा झाला. यावेळी संघटनेचे सचिव कॉ. शंकर पुजारी म्हणाले, देशातील बँकांचे पैसे बुडविण्याचे काम मूठभर भांडवलदार करीत आहेत. परंतु, आज गरीब कर्जदारांकडे तगादा लावला जातो. पर्ल्स कंपनीची देश व परदेशातील स्थावर मालमत्ता 1 लाख 85 हजार कोटी रुपयांची आहे. कंपनीने मागील 15 वर्षांत 60 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार पर्ल्स कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावास सुरुवात झाली असून, मागील दोन वर्षात 800 कोटी रुपये जमले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने पर्ल्सची सर्व मालमत्ता विक्री करून सहा महिन्यांत देशातील सहा कोटी लोकांना गुंतविलेली त्यांची रक्‍कम परत करण्याचे आदेश दिले. परंतु, दोन वर्षांनंतरही गुंतवणूकदारांना पैसे मिळालेले नाहीत. गुंतवणूकदारांना स्वत:च्या कष्टाचे पैसे परत मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कॉ. विजय बचाटे यांनी आंदोलनाची माहिती दिली. कॉ. सुमन पुजारी यांनी आभार मानले. यावेळी अनिल म्हमाणे, एस. एम. हंकाळी, केरबा शेटे, तुकाराम केरलेकर यांच्यासह जिल्ह्यातील पर्ल्स गुंतवणूकदार उपस्थित होते.

Tags  :  Kolhapur, Kolhapur News, Perls Investor Association, organized,  meeting,  Saturday