Mon, May 27, 2019 00:40होमपेज › Kolhapur › शेट्टी यांना जनता धडा शिकवेल : ना. खोत

शेट्टी यांना जनता धडा शिकवेल : ना. खोत

Published On: Dec 03 2017 1:29AM | Last Updated: Dec 03 2017 12:52AM

बुकमार्क करा

कुरूंदवाड : वार्ताहर 

खासदारकीच्या सोयीसाठी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना, नेत्यांना मिठ्या मारणार्‍या आणि शेतकर्‍यांचा नेता असल्याचा आव आणणार्‍या खासदार राजू शेट्टी यांना येत्या निवडणुकीतही गोरगरीब जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.

शिरढोण (ता. शिरोळ) येथे रयत क्रांती कष्टकरी संघटनेच्या शाखा प्रारंभप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, सुरेश सासने, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे, सागर खोत आदी प्रमुख उपस्थित होते.

ना. खोत म्हणाले, खा. शेट्टी यांना मोठे करण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून अनेकांना अंगावर घेत रक्त सांडून येरवडा आणि कळंबा जेल भोगले. म्हणून ते राज्यात चमकले.
यावेळी ना. खोत यांनी शेतकरी, कष्टकर्‍यांच्या सोयीसाठी अ‍ॅम्ब्युलन्स देण्याची घोषणा केली. स्वागत सुरेश सासने यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, सरपंच बिल्किस मुजावर, सागर खोत, दीपक भोसले  यांनी मनोगते व्यक्त केली.