Sat, Jul 20, 2019 12:55होमपेज › Kolhapur › कुरुंदवाडमध्ये फॅन्सी नंबरप्लेटसह फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई 

कुरुंदवाडमध्ये फॅन्सी नंबरप्लेटसह फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई 

Published On: Jun 05 2018 5:15PM | Last Updated: Jun 05 2018 5:15PM कुरुंदवाड/प्रतिनिधी
 कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेने वाहन तपासणी मोहिमेत काका, मामा, दादा आणि साहेब अशा फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून हिंडणाऱ्या वाहकाकडून पोलिसांनी  5 हजाराचा दंड वसुल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अण्णासाहेब शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई  केली. 

कुरूंदवाड पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने आज सकाळी दहा वाजल्यापासून नृसिंहवाडी रस्त्यावर फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहन चालकांविरोधात मोहिम हाती घेतली होती. ज्या गाड्यांवर फॅन्सी नंबरप्लेट आहेत अशी वाहने जप्त करून नंबर प्लेट बदली केल्यानंतर दंडात्मक कारवाई करून वाहने सोडण्यात आली. या कारवाईमुळे फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान आर.टी.ओ  नियमाप्रमाणे नंबर प्लेट तयार करण्यासाठी पेंटिंग व रेडियम दुकानात वाहनधारकांनी गर्दी केली होती.