Fri, Jan 18, 2019 01:31होमपेज › Kolhapur › पाटणकरांचा प्रसिद्धी स्टंट

पाटणकरांचा प्रसिद्धी स्टंट

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 12:51AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

देव-धर्म न मानणार्‍या डॉ. भारत पाटणकर यांना आजच अंबाबाई दर्शनासाठी आणि तेही गाभार्‍यात जाऊन दर्शन घेण्याची काय आवश्यकता पडली, असा सवाल करत त्यांचा हा प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला. मंदिराच्या गाभार्‍यात घुसून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू पाहणार्‍या डॉ. पाटणकरांवर त्वरित कारवाई करा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

समितीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, डॉ. पाटणकर यांनी अंबाबाई मंदिरात गाभार्‍यात सोवळ्याशिवाय घुसण्याचा प्रयत्न केला, हे अत्यंत निषेधार्ह आहे. स्वत:ला विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणवणार्‍या पाटणकर यांना समाजात राहताना काही नियम आहेत, त्याचे पालन करायचे असते, त्या मंदिराचे जे धर्मशास्त्रीय आणि परंपरागत नियम आहेत, त्यांचे पालन करायला पाटणकरांना काय अडचण आहे? देवाला न मानणारे अंबाबाईला साकडे घालायला कसे आले? हा सर्व प्रकार जातीय विद्वेष पसरून समाजात फूट पाडण्याचे त्यांचे षड्यंत्र आहे, पण ते यशस्वी होऊ देणार नाही असेही समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.