Mon, Aug 19, 2019 00:39होमपेज › Kolhapur › पानसरे खून खटला सुनावणी लांबणीवर

पानसरे खून खटला सुनावणी लांबणीवर

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 12:03AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे खून खटल्याची सुनावणी मंगळवारी पुन्हा लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणी येत्या 9 जुलैला होणार आहे. अतिरिक्‍त व सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. यावेळी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे उपस्थित होते. आरोपीविरुद्ध दोषारोप निश्‍चितीला मुंबई उच्च न्यायालयाची अजूनही स्थगिती असल्याने सुनावणीचे कामकाज होऊ शकले नाही.