Wed, Mar 27, 2019 00:35होमपेज › Kolhapur › कॉ. पानसरे युवा जागर शिबिर होणार पन्हाळ्यात

कॉ. पानसरे युवा जागर शिबिर होणार पन्हाळ्यात

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 19 2018 12:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने पन्हाळा येथे 11 ते 13 मेदरम्यान कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

यंदाच्या शिबिरात ‘मी आणि माझा भवताल’ या बीज विषयाशी संलग्‍न उपविषयांवर नामवंत मार्गदर्शन करणार आहेत. पन्हाळा येथील संजीवन इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या तीनदिवसीय निवासी शिबिरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषा संशोधक व समीक्षक पद्मश्री डॉ. गणेश देवी ‘20 व्या शतकातील युवकांच्या आकांक्षा व वस्तुस्थिती’ याचा आढावा घेणार आहेत. डॉ. हमीद दाभोलकर हे ‘युवकांचे भावविश्‍व, अंधश्रद्धा व विवेकी जीवन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

सुप्रसिद्ध नाटककार व दिग्दर्शक अतुल पेठे, कॉ. अजित अभ्यंकर, ज्येष्ठ विचारवंत इरफान इंजिनिअर, अभिजित घोरपडे आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकांनी सुशील लाड, मल्हार पानसरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.