Sun, Sep 23, 2018 10:29होमपेज › Kolhapur › पर्यटकांना लुबाडणारा तोतया पोलिस गजाआड

पर्यटकांना लुबाडणारा तोतया पोलिस गजाआड

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 31 2017 1:35AM

बुकमार्क करा
पन्हाळा : प्रतिनिधी

पोलिस असल्याचे सांगून व भीती दाखवून पर्यटकांना लुबाडणारा तोतया पोलिस सागर आनंदा गराडे (रा. मोहरे, ता. पन्हाळा) यास पर्यटकांच्या मदतीने पकडून पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अनेक दिवसांत वाटमार्‍या, गाड्या फोडून साहित्य चोरीच्या अनेक घटना पन्हाळा व परिसरात घडल्या आहेत. याबाबत पन्हाळा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक रवींद्र साळोखे यांनी केले आहे. 

गराडे तोतया पोलिस आलिशान मोटारीतून फिरत असे. ही मोटार एका अधिकार्‍याची असून या गाडीवर तो चालक आहे. अधिकार्‍यास कार्यालयात सोडल्यानंतर सायंकाळी कार्यालय सुटेपर्यंत तो तोतया पोलिस बनून पन्हाळ्यात पर्यटकांना लुटत होता. पर्यटकांच्या धाडसाने तो सापडला. ही आलिशान गाडी गेले अनेक दिवस चर्चेत होती.  कोदे (ता. गगनबावडा) येथील रहिवाशी व संजीवन कॉलेजचा विद्यार्थी संतोष बाळू पाटील हा मित्र अभिषेक याच्यासमवेत 28 डिसेंबर रोजी  दुपारच्या सुट्टीत मित्रांसमवेत पन्हाळा पावनगड परिसरात फिरण्यासाठी गेले होते.

त्यावेळी  गराडेने  संतोष व त्यांच्या मित्रांना पोलिस असल्याची बतावणी करून  दमदाटी  केली व संतोषकडून जबरदस्तीने रोख 3000 रुपये व दोन घड्याळे काढून घेतली. संतोषने घडला प्रकार कोणास सांगितला नाही; परंतु तोतया पोलिस गरडे संतोषला वारंवार फोन करून पैशाची मागणी करू लागल्याने गराटे याने सांगितलेल्या पुसाटी बुरुज या ठिकाणी संतोष आला.  यावेळी संतोषबरोबर आलेल्या मित्रांनी गराडेस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.