Sun, Apr 21, 2019 06:32होमपेज › Kolhapur › ‘गडकोट’च्या शिवप्रेमींची पन्हाळगडावर स्वच्छता मोहीम

‘गडकोट’च्या शिवप्रेमींची पन्हाळगडावर स्वच्छता मोहीम

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 18 2018 11:58PMपन्हाळा : प्रतिनिधी

शिवजयंती कशी साजरी करायची, पन्हाळगडावरून शिवज्योत आणायची का? शिवजन्मसोहळा साजरा करायचा? हा विचार प्रत्येक शिवप्रेमींचा सुरू असताना कोल्हापुरातील गडकोट गिर्यारोहक संस्थेच्या शिवप्रेमींनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला अन् अंमलात आणला. नितीन देवेकर यांच्या नेतृत्वाखाली, या हौशी गिर्यारोहकांनी पन्हाळा किल्ल्यावरील ऐतिहासिक  बुरुज स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला.

पुसाटी बुरुज परिसरात या शिवप्रेमींनी आज सकाळपासून बुरुजावरील झाडेझुडपे तोडून साफ केली. बुरुजावर उगवलेले गवत काढून टाकले व काट्याकुट्यांनी वेढलेला हा परिसर लख्ख केला. पुसाटी बुरजाला झळाळी आली. खर्‍या अर्थाने शिवजंयती साजरी करण्याचा एक अनोखा उपक्रम या मंडळींनी जोपासला. पन्हाळा फिरायला येणार्‍या पर्यटकांनीदेखील या गडकोट गिर्यारोहींची दखल घेतली. सर्वांनी या तरुणाईच्या कामाला मनापासून दाद दिली. या गिर्यारोहिंनी हाती घेतलेला गडकोट सफाईचा विधायक उपक्रम सर्वांना 
आदर्श शिवजयंतीचा पाठ देऊन गेला. 

स्वच्छता मोहिमेत नितीन देवेकर, गजानन गराडे, भरत नेजकर, अमोल शिर्के, ऋतुराज पाटील, विश्‍वास पाटील, मोहन पाटील, विनायक कुंभार, रामदास माने, शीतल गोटडगी, ओंकार पाटील,  सत्यजित जाधव हे गडकोट गिर्यारोही सहभागी झाले होते.