Thu, Jun 27, 2019 10:05होमपेज › Kolhapur › पंचगंगा घाट भाविकांच्या गर्दीने फुलला

पंचगंगा घाट भाविकांच्या गर्दीने फुलला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा शनिवार हा मुख्य दिवस असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशातून आलेल्या लाखो भाविकांनी पंचगंगा घाट फुलून गेला होता. पंचगंगा घाटावर अनेक सामाजिक संस्थांकडून शिरा, सरबताचे वाटप करण्यात आले.

जोतिबा डोंगरावर  कोल्हापूरमार्गे जाणारे भाविक पंचगंगा नदीत स्नान करून जात होते. तसेच जोतिबाचे  दर्शन घेऊन गुलालने नाऊन निघालेले भाविक पंचगंगेत स्नान करून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी जात होते. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अग्‍निशमन दल, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर पोलिस दलाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पंचगंगा घाटनावर आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले  होते. पंचगंगा नदी घाटावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वालावलकर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी शिरा वाटप करण्यात आला. केर्लीच्या मागे वाकरे फाट्यावर जोतिर्लिंग ग्रुपच्या वतीने भाविकांना सरबत वाटप करण्यात आले.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Panchganga Ghat, full, crowd, devotees


  •